भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल तालुक्यातील विवाहिता बेपत्ता

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील ३३ वर्षीय विवाहिता गेल्या आठ दिवसांपासून जळगाव येथे जाते असे सांगून घरून गेली असता तेव्हा पासून बेपत्ता आहे.

यावल तालुक्यातील कासारखेडा येथील सोनी अमित पाटील या विवाहितेचे पती नोकरी निमित्त दुबई येथे गेल्याने सोनी पाटील ही आपल्या तीन मुलांसह माहेरी आई प्रमिलाबाई तोताराम पारधे यांच्या कडे राहाते.२८ मार्च रोजी सोनी पाटील हिने मुलांसाठी कपडे घेण्यासाठी जळगाव येथे जात असल्याचे सांगून घरून निघाल्या असता तेव्हा पासून त्या बेपत्ता झाल्या रात्री उशीरा त्या घरी न आल्याने त्यांची आई प्रमिलाबाई सह इतर नातेवाईकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू त्या आढळून न आल्याने विवाहितेची आई प्रमिलाबाई यांनी यावल पोलिसस्टेशनला तक्रार केल्याने
बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!