भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

बाबो… अजबच चक्क सट्टा पिढी मालकांच्या विरोधात सट्टा-बिट घेणाऱ्यांचा संप

फैजपूर,ता.यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। आजपर्यंत आपण सेवा सवलती मिळाव्यात या साठी कर्मचारी संप, कामगार संप, व्यापारी संप असे अनेक प्रकारचे संप बघितले असतील परंतु अवैध व्यवसाय असलेल्या सट्टा/ मटका-बिट लिहिणाऱ्यानी कधी संप केला असे ऐकले नसेल ही वस्तू स्थिती आहे, ही घटना घडलीय यावल तलुक्यातील न्हावी गावात चक्क पोलीस प्रशासनाच्या कार्याचा भांडाफोड झाला असून सट्टा सम्राटां विरोधाय बुकीच संपावर गेल्याने सट्टा व्यवसाय ठप्प झाला आहे.

यावल तालुक्यातील न्हावी गावात दोन मोठे सट्टा- बिट (पिढी) मालक असून यांचा सट्ट्याचा व्यवसाय न्हावी गावा सह संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातील २८ गावात मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. याचे शेकडो कमिशन एजेंट कमिशन घेऊन सट्ट्याचे आकडे लिहीण्याचे काम करीत असतात, न्हावी गावातील सट्टा पिढी मालकांकडून सट्टा बिट घेणाऱ्यांना १०% कमिशन दिले जाते, त्यामध्ये पोलिसांची कारवाई झाल्यास त्यासाठी लागणारा खर्च मिळणाऱ्या कमिशन मधून करावा लागतो तो बिट घेणाऱ्याना परवडणारा नसल्याने बिट चालकांनी १० टक्के कमिशन ऐवजी वाढवून २० टक्के कमिशन दयावे यासाठी न्हावी गावातील जवळ-जवळ ५० बिट चालकांनी संप पुकारला आहे. या प्रकाराने अवैध धंद्याना पोलिसांकडून रान खुले केल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

जो पर्यत कमिशन वाढवून मिळत नाही तो पर्यत गावातील एकही बिट लिहिणारा दुकान उघडणार नाही व ज्या ही बिट लिहिणाऱ्याने दुकान उघडल्यास त्याला चोप दिला जाईल या धाकाने सर्व बिट चालक हातावर हात धरून कमिशन वाढण्याची वाट पाहत बसले आहेत. सट्टा पिढी मालकांबद्दल माहिती घेतली असता, सट्टा लिहिणाऱ्यांचे कमिशन, नोकरांचे पगार, पोलिसांचे हप्ते, यात बिट हवालदारा पासून ते वर पर्यंत, असा सर्व खर्च आम्हाला करावा लागतो. असे सट्टा बिट मालकांच्या गोटातून बोलले जाते. सट्टा मालक महिन्याला पोलिसांना लाखो रुपये हप्ते देत असल्याचे छाती ठोक बोलत आहेत. म्हणजे सर्व अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.हा अवैध धंदे सुरू असल्याचा मोठा पुरावा नाही तर काय?


सट्टा मालक रोज सट्ट्याच्या व्यावसायातुन लाखो रुपये कमावत असून यात सट्टा मालक मालामाल होत असून सट्टा खेळणारे मात्र कंगाल होतं असल्याचे चित्र मात्र दिसत आहे.पोलिसच अवैध व्यवसाईकांशी आर्थिक हितसंबंधातून हितसंबंध जपत असतील तर या कडे लक्ष कोण देणार?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!