यावलसामाजिक

समरसता महाकुंभ ; गोमूत्र व शेना पासून तयार केलेले उत्पादनाचे संत महात्म्यांच्या हस्ते लोकार्पण

फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री जगन्नाथ गोशाळे च्या माध्यमातून गाईचे शेण व गोमूत्रापासून जगन्माता निष्कलंक गोवरी, जगन्माता निष्कलंक सुगंधित धूप तसेच अगरबत्ती या नैसर्गिक व पर्यावरण पूरक गुणधर्म उत्पादनाचे लोकार्पण परमपूज्य श्री राधे राधे बाबा, परमपूज्य श्री सुरेश शास्त्री मानेकर बाबा तसेच सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या हस्ते निष्कलंक धाम वडोदा येथे भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले.

श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते तसेच संजीवनी ब्लड बँकेचे संचालक यांनी मिळून हे उत्पादन तयार केले आहे. या महत्त्वपूर्ण व आगळ्यावेगळ्या प्रकल्पाच्या उत्पादनातून मिळणारा पैसा जगन्नाथ गोशाळेसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी सांगितले. या उत्पादनाचे लोकार्पण समरसता महाकुंभाच्या पवित्र भूमीवर करण्यात आले. यावेळी सनातन सतपंथ परिवारातील असंख्य कार्यकर्ते व संत महंत उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!