भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

धक्कादायक : यावल तालुक्यातील नर्सिंग च्या विद्यार्थिनीची जळगाव येथे गळफास घेत आत्महत्या

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव येथे शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात नर्सिंग च्या प्रथम वर्षाला असलेल्या  यावल तालुक्यातील करुणा संतोष बोदडे .वय २२ वर्ष, वाढोदा.. यावल तालुका , ह .मु. दीक्षितवाडी, जळगाव. या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मैत्रीणी गावाकडे गेलेल्या असल्याने रुममध्ये ती एकटीच होती. तरुणीने अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे तिच्या मैत्रीणींसह कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

या संदर्भात मिळालेल्या अधिक माहिती नुसार, वाढोदा. यावल तालुक्यात  राहणारी करुणा  बोदडे. वय २२ वर्ष,  ह .मु. दीक्षितवाडी, जळगाव. ही विद्यार्थिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात पदव्युत्तरचे शिक्षण घेत होती. दिक्षीतवाडी परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये ती अन्य तीन मैत्रीणींसह रुम करुन राहत होती. सद्या सण असून महाविद्यालयाला सुट्टी असल्याने तीच्या तिघ मैत्रीणी गावाकडे गेल्या होत्या.म्हणून ती खोलीवर एकटीच होती, खोलीवर एकट्याच असलेल्या करुणाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास जेवण केले त्यानंतर पाणी भरल्याचे तिच्या घरमालक असलेल्या वृद्ध महिले कडून सांगण्यात आले.

काल रविवार दि. ७ एप्रिल रोजी संध्याकाळी करुणाची रुम पार्टनर असलेली एक मैत्रिण जळगावात आली. त्या वेळी तीने रुमचा दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ दरवाजा ठोठावून देखील आतून प्रतिसाद मिळत नसल्याने तीने ही बाब घरमालक असलेल्या महिलेला सांगितली. त्यांनी त्या खोलीच्या मागील दरवाजा उघडला असता, त्यांना करुणा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना धक्काच बसला.

या बाबत घर मालकाने घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख, एपीआय मोरे, जुबेर तडवी, अमित मराठे, युनूस तडवी, नरेंद्र दिवेकर यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. दिक्षीत वाडी परिसरात करुणासह तिच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या अनेक मैत्रीणी वास्तव्यास आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी करुणाच्या रुमजवळ आल्या. करुणाचा मृतदेह बघताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मयत तरुणीचे कुटुंबीय रुग्णालयात आले. त्या वेळी त्यांनीही मोठा आक्रोश केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!