क्राईमनाशिक

मोठी बातमी! तलवारी नाचवत भरवस्तीत टोळक्याकडून गोळीबार

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे. टोळीयुद्धातून टोळक्यानं भरवस्तीत तलवारी नाचवत गोळीबार केल्याने नाशिक शहर हादरले असून या घटनेनं शहरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर भर रस्त्यात टोळीयुद्ध भडकल्याची घटना घडली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटने बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर रस्त्यातच टोळीयुद्ध भडकलं. तलावारी नाचवत टोळक्याकडून भरवस्तीत गोळीबार करण्यात आला. ही घटना सिडकोमध्ये असलेल्या त्रिमूर्ती चौक परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!