आडगाव येथील तरुणांची गळफास लावून आत्महत्या : तालुक्यातील दुसरी घटना
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील आडगाव येथे एका शेतमजुरी करणाऱ्या तरूणाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून तालुक्यातील किनगाव पाठोपाठ ही दुसरी घटना घडली आहे.
दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, तालुक्यातील २२ वर्षीय या शेतमजुरी करणारा तरुण आडगाव येथील अजय उर्फ भिमा उत्तम इंधाटे यानें त्याची आई गावाला गेली असता सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या लोखंडी हेंगलला दोरी बांधुन आत्महत्या केली असून याप्रकरणी धनराज गोंविंद बागुल यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख हे करीत आहे.
दरम्यान, तरूणाच्या आत्महत्याचे कारण मात्र स्पष्ट होवु शकले नाही. मात्र, तालुक्यातील एकाच दिवसात ही दुसरी घटना असून किनगाव येथे ही एका अविवाहीत तरूणाने आत्मह्त्या केल्याची घटना घडली होती. त्यांनतर आता आडगावच्या येथिल घटना समोर आली आहे.