भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल पोलिसांचा धाक संपला ! डीवायएसपी उतरले रस्त्यावर; पो.नि. धनवडेंची बदली राजकारणामुळे-चर्चेला उधाण

यावल (सुरेश पाटील)। कोरोना विषाणूच्या महामारीत एक कर्तव्यदक्ष आणि सडेतोड निर्भिड शासकीय कामकाज करणारे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली झाल्यानंतर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील दोन नंबरचे आणि चुकीचे व्यवसाय करणाऱ्यांवरील पोलिसांचा धाक संपला असल्यानेच फैजपूर भाग डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांना स्वतःरस्त्यावर उतरुन उपद्रवी ठरलेल्या नागरिकां विरुद्ध कारवाई करावी लागली.पोलीस अधीक्षक जळगाव यांच्यावर राजकीय दबाव वाढल्याने पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली करावी लागली असल्याचे आता पुन्हा यावल तालुक्यात चर्चिले जात आहे.

पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे स्वतः एकटे मागील वर्षी मार्च महिन्यानंतर कोरोनाविषाणू प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावागावात आणि यावल शहरातील गल्लीबोळात शासकीय वाहनाद्वारे फिरून लाऊडस्पीकर द्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सक्रीय प्रयत्न केले होते आणि आहेत, कोरोनाचे नियम उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध आणि वाळूतस्करां विरुद्ध त्यांनी धडक कारवाई केल्याने दोन नंबर व्यवसायिकांना राजकीय आश्रय देणाऱ्यांमध्ये तसेच दोन नंबर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली होती, काही दोन-तीन पदाधिकार्‍यांनी तर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडे मासिक हप्त्याची सुद्धा मागणी केल्याने आणि ती मागणी धनवडे यांनी नाकारल्यामुळे काही घटनांचे निमित्त साधून पोलीस अधीक्षक जळगाव आणि पोलीस डिआयजी यांच्याकडे राजकीय प्रभावाचा वापर करून धनवडे यांची बदली करण्यात आली असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात राजकारणात समाजात बोलले जात आहे

तसेच बदली करणाऱ्यांच्या नैतिकते बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून समाजहित धोक्यात आले आहे तसेच धनवडे यांच्या बदली संदर्भात पोलीस अधीक्षक जळगाव यांनी सखोल चौकशी न करता ठोस कारण नसल्यावर सुद्धा धनवडे यांना पोलीस हेडकॉटरला जमा करण्याचा आदेश काढून टाकला पोलीस निरीक्षक धनवडे यांचा कार्यकाळ अपूर्ण असताना तसेच कायदेशीर ठोस कारण नसताना हेडकॉटरला जमा केल्याने पोलीस अधीक्षक जळगाव यांनी राजकीय प्रभावाला न जुमानता आता पुन्हा धनवडे यांची बदली यावल पोस्टेला करून कायदा व सुव्यवस्था जातीय सलोखा सामाजिक हित कायम राखावे असेच सर्वस्तरातून बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!