सराफ पेढी जबरी चोरी मध्ये रोकड सह ११ लाख २६ हजाराचा माल लुटला
Monday To Monday NewsNetwork।
यावल(प्रतिनिधी)। जबरी चोरीप्रकरणी तीन स्थानिक पोलिस पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दोन अशी पाच पथक विविध भागात तपासासाठी रवाना करण्यात आले आहेत
जबरी चोरीचा गुन्हा दाखल
येथील बाजीराव काशिदास कवडी वाले सराफ पेढी जबरी लूट प्रकरणी पेढीचे संचालक जगदीश कवडी वाले यांनी सायंकाळी फिर्यादीनुसार 240 ग्रॅम वजनाचे सोने व 55 हजार रुपये रोकड असा 11 लाख 26 हजार 675 रुपये अज्ञात चोरट्यांनी जबरीने चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे. यावरून चार अज्ञात चोरट्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात जबरी चोरी सह आर्म एक्ट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे उपविभागीय पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील फौजदार जितेंद्र खैरनार हेडकॉन्स्टेबल संजय तायडे गोरख पाटील व सहकारी तपास करीत आहेत
17 वर्षानंतर ची ही दुसरी चोरी
गेल्या सतरा वर्षातील कवडी वाले यांचे दुकानातील ही दुसरी चोरी आहे सन 2002 मध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुकान फोडून सुमारे 18 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता तर बुधवारी सुमारे बारा लाखाचा ऐवज लंपास केला आहे त्यामुळे 17 वर्षात 29 लाख रुपयांचा ऐवज दुकानातून चोरट्यांनी लांबवला आहे गेल्या वर्षी सन 2019 ला अज्ञात चोरट्यांनी हेच दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता
चहूबाजूने तपास सुरू
शहरात विविध ठिकाणी पोलीस ठाण्याच्या वतीने हेच खाजगी सीसी कॅमेरा मध्ये चोरटे कुठून कुठे व कुठून आले व कुठे गेले ते दिसून येतात का याचा शोध पोलीस घेत आहेत असे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी सांगितले यापूर्वीही चोरटे या परिसरात येऊन गेले का याचाही शोध घेत आहेत