यावल मुख्याधिकारी बबन तडवी कंत्राटदाराकडून लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा | अनेकदा आरोप करण्यात आलेले येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना कंत्राटदाराकडून २८ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाकडून रंगेहात अटक करण्यात आल्याने नगरपालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी, एका कंत्राटदाराला साठवण बंधार्याचे काम मिळवून देण्यासाठी मुख्याधिकार्यांनी लाचेची मागितली केली यामुळे संबंधीत कंत्राटदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यानुसार पथक तयार करण्यात आले. या पथकाने आज शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास यावल येथील नगरपालिकेत सापळा रचत यात मुख्याधिकारी बबन तडवी ह २८ हजार रूपयांची लाच घेतांना अडकले. त्यांना या पथकाने रंगेहात अटक केली. अटक करताच त्यांना घेऊन पथक जळगावकडे रवाना झाले. अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या या कारवाईमुळे नगरपालिका वर्तुळात हादरे बसले असून यानंतर पथक बबन तडवी यांना घेऊन रवाना झाल्यानंतर याच घटनेचे चर्वण सुरू झाले आहे. कंत्राटदारांना आपली कामे करून घेण्यासाठी अधिकाऱ्याना हजारो लाखो रुपयांची लाच द्यावी लागते हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.
बर्याच प्रकरणांमध्ये मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र आज थेट त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या अटकेचा संबंध नगरपालिकेतील राजकीय वादाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.