भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

निंबादेवी धरण भरले, धरणावर हजारो पर्यटकांची गर्दी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतेक सर्वच प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले निंबादेवी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले असून, या ठिकाणी वर्षाविहारासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. कळलं रविवारी सुटीचा दिवस असल्याने निंबादेवी धरणावर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती.

जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सातपुडा पर्वतरांगेतील चिंचपाणी, मनुदेवी, वाघझिरा व निंबादेवी धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. याठिकाणी ट्रेकिंगसह पाण्यात डुंबण्याचा आनंद घेता येत असल्याने अनेक जण विकेंड घालवण्यासाठी येथे येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे गरजेचे असताना याठिकाणी मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!