भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल येथे अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतुक करणारे डंपर जप्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल- किनगाव रस्त्यावर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपर ताब्यात घेतले आहे.

यावल पोलिस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव- यावल रस्त्यावर अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाल्याने त्यांनी सहाय्यक फौजदार शरद शिंदे, पोलीस नाईक अल्ताफ अली आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांचे पथक तयार करून कारवाईच्या सुचना दिल्या.या पथकाने सोमवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास यावल शहराजवळील फॉरेस्ट नाका जवळ नाकाबंदी केली. त्यावेळी किनगावकडून यावलकडे जाणारा डंपर येतांना दिसून आला. त्यात चोरटी वाहतूक करतांना दिसून आले. त्यांची चौकशी केली असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आल्याने वाळूने भरलेले डंपर यावल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले .

या प्रकरणी डंपर चालक गणेश गंगाराम सोनवणे,वय-३२, रा. ममुराबाद, ता. जि.जळगाव आणि डंपर मालक संदीप आधार साळुंखे रा. कोळन्हावी ता. यावल या दोघां विरोधात पो हे काँ सुमित बाविस्कर याच्या फिर्यादी वरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन चव्हाण हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!