अंजाळे येथे महीलेचा विनयभंग तीन संशयीताविरुध्द अक्ट्रासीटी सह मारहाणीचा गुन्हा दाखल
Monday To Monday NewsNetwork।
यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील अंजाळे येथील गावातील तीघानी एका कुटुंबाच्या घरात अनधिकृत घुसून कुटुंबातील मंडळीस लाथा-बुक्यासह लोखडी सळईने बेदम मारहाण करून घरातील 42 वर्षीय महीलेचा विनयभंग केल्याची तक्रार पिडीत महीलेने दिल्यावरून तीन संशयीताविरुध्द अक्ट्रासीटी गुन्ह्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की अंजाळे येथील 42 वर्षीय महीलेने येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी गावातील संशयीत आरोपी धिरज बाळू कोळी , गोलु बाळु कोळी आणी नितिन वसंत तायडे या तीघानी माझ्या मुलांस अडवून तुम्ही खुप हुशारी करता ते तुम्हाला महागात पडेल अशी धमकी दिली होती. परंतु आम्ही त्यांना घाबरून याबाबत तक्रार केली नाही. १३ जुन रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी धिरज बाळू कोळी , गोलु बाळु कोळी आणी नितिन वसंत तायडे यांनी आमचे घराजवळ येवून जोर-जोराने जातीवाचक शिवागाळ केली असता आम्ही बाहेर येवून पाहीले तेव्हा त्यांनी मारहान केली. घरात घुसून मुलाच्या डाव्या हाताचे कामेवर चाकुने,लोखंडी सळई ने मारहाण केली तसेच माझेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.पिडीत महीलेच्या फिर्यादिवरून येथील पोलीस ठाण्यात तीन संशयित विरुद्ध भादवी अट्रोसिटी कलम 3(1)(r ) नुसार 354, 323, 504, 506, 326 भारतीय दंड संहिता 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन. पुढील तपास फैजपुर विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेन्द्र पिंगळे, हे. काॅ. संजय तायडे करीत आहेत.