Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावदा येथे रेती ट्रॅक्टरवर
अवैध गौणखनिज पथकाची कारवाई

Monday To Monday NewsNetwork।

सावदा ता.रावेर.(प्रतिनिधी)।दिनांक १४/0६/२०२१ रोजी दुपारी १२ वाजता अवैध गौण खनिज पथक, सावदा मंडळ ता. रावेरचे पथक प्रमुख बी. एम. पवार. मंडळ अधिकारी- सावदा. ता रावेर, एस. के. पाटील. तलाठी- सावदा, एम. एच तडवी. तलाठी- थोरगव्हाण, श्रीहरी कांबळे. तलाठी- रायपूर, ओ. एस. मटाले. तलाठी- मस्कावद,मोमीन. तलाठी- उधळी ,प्रोपेस चोपडे. तलाठी- गाते. यांनी मिळालेल्या माहितीवरून सावदा येथे अशोक माधव महाजन, रा.दसनुर,ता,रावेर याचे मालकीचे ट्रॅक्टर न. MH 19 E 1274 हे रेतीचे ट्रॅक्टर जप्त केले व त्याचा पंचनामा करून सावदा पोलिसस्टेशनला जमा केले. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी फैजपूर व रावेर तहसीलदार याचे मार्गदर्शना नुसार कारवाई केली.कारवाई करूनही काही जबर अवैध रेती वाहतूकदार, व ऐजेंट वाहतूक करीतच आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!