भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल तालुक्यात विषारीद्रव्य प्राशन करुन तरुणीची आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यातील दहीगाव येथील सुरेशआबा नगर मधील सुजाता संतोष पाटील या २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याने खडबड उडाली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, दहीगाव येथील यावल रस्त्यावरील सुरेश आबा नगर मधील उच्च शिक्षीत तरूणी सुजाता पाटील हिने आज रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपुर्वी आपल्या राहत्या घरात तिने काही तरी विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून याबाबत मयत तरूणीचे काका काशीनाथ एकनाथ पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलिसस्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ . बी बी बारेला यांनी मयताचे शवविच्छेदन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!