एरंडोलक्राईम

रक्षकच बनला भक्षक ; वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

एरंडोल, जि जळगाव ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एरंडोल तालुक्यात ज्याच्यावर रक्षणाची जबाबदारी टाकली त्यानेच वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

एरंडोल तालुक्यात एका मुलींचे वसतीगृहात पाच अल्पवयीन मुली अभिरक्षेत असतांना सदर वसतीगृहातील काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने पाचही बालिकांशी ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या दरम्यानच्या दहा महिन्याच्या काळात वेळोवेळी लैंगीक छळवणूक करुन अनसर्गिक अत्याचार देखील केलेला आहे. तसेच सदरची माहीती मुलींनी संस्थेच्या अधिक्षक व सचिव यांना वेळोवेळी दिली असतांना त्यांनी सदरची माहीती लपवुन ठेऊन घृणास्पद कृत्य करणाऱ्या काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याला सहकार्य केल्याच तपासात निष्पन्न झालं या प्रकरणी काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत त्याच्यासह आरोपीचीच पत्नी असलेल्या अरूणा गणेश पंडित आणि संस्थेचा सचिव भिवाजी दीपचंद पाटील या तिघांच्या विरोधात पीएसआय शरद बागल यांच्या फिर्यादीवरून भा.द.वि.क. ३५४, ३७६ (२) (ड) (एन) (क), ३७७, POCSO कलम ३,४,५, ६,८,९,१०,१२, १९, २१, सह अनुसुचीत जाती व जमाती कायदा कलम ३ (१) (अ) (ई) (व्ही) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयित आरोपी अटकेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!