Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस सह तरुणाला भुसावळ मध्ये अटक

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील भाऊचा ढाबा या परिसरातून इम्रान उर्फ मॉडेल रसूल शेख या तरुणांकडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून सुमारे ५२ हजारांचा मुद्देमाल बाजारपेठ पोलिसांनी जप्त केला.

बाजारपेठ पोलिसाना वरणगाव रोडवरील भाऊचा ढाबा परिसरात इम्रान रसूल शेख हातात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली  त्या नुसार त्यांच्या पथकाने इम्रान उर्फ मॉडेल रसूल शेख, वय २१ वर्ष. भारत नगर, भुसावळ. याला ताब्यात घेत त्याची  झडती घेतली असता त्याच्या कडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५२ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमालासह इम्रान शेख याला अटक केली असून ही कारवाई कृष्णांत पिंगळे व बाजारपेठ पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक मंगेश जाधव, महेश चौधरी, अमर आढाळे, प्रशांत सोनार भूषण चौधरी यांच्या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!