फैजपूर येथील तरुणाचा पुण्यात अपघातात मृत्यू
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील फैजपूर येथील तरुणाच्या दुचाकीला पुणे येथे सासवड भागात डंपरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
फैजपूर शहरातील पेहेड वाड्यातील रहिवासी भावेश सुरेंद्र चौधरी. वय २२ वर्ष. या तरुणाचे ८ रोजी शनिवारी पुणे (सासवड) येथे दुचाकीवरून जात असताना रस्त्यात डंपरला धडक बसून भावेशचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे.

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होऊन सहा महिन्यांपूर्वीच तो पुणे येथे नोकरीस लागला होता. शनिवारची सुटी असल्याने एका कामानिमित्त जात असताना सासवड येथे अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर फैजपूर येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.