यावल तालुक्यातील तरुणाची तापी नदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील ३५ वर्षीय तरुणाने तापी नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दि.२४ मे शुक्रवार रोजी दुपारी घडली.
यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवाशी शंकर मदन रल. मूळ राहणार विरावली, हल्ली मुक्काम दहिगाव. ता. यावल, या ३५ वर्षीय तरुणाने शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकीने भुसावळ येथील तापी नदी पुलावर जाऊन दुचाकी पुलावराच सोडून पुलावरून नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली.
त्याचा मृतदेह यावल येथील रुग्णालयात आणून शविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.या बाबत यावल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवालदार संदीप सुर्यवंशी हे करीत आहेत.