भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्य

‘ओ’रक्तगट,शाकाहारी व धुम्रपान करणारे लोकांना कोविडचा धोका कमी तर ‘बी’व ‘एबी’ ना अधिक ; निष्कर्ष.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई ( वृत्तसंस्था )। केलेल्या अभ्यासानुसार, धुम्रपान करणाऱ्याच्या शरीरात शेंबडाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे विषाणूच्या प्रादुर्भावापासून प्राथमिक संरक्षण होत असावे असा अंदाज अहवालात मांडण्यात आला आहे. तर शाकाहारी व्यक्तींमध्ये फायबरचे प्रमाण मोठे असल्याने त्यातून दाह कमी करत आतड्यांना सशक्तपणा येत असल्याने त्याद्वारे कोविड-19 शी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोग प्रतिकारकशक्ती प्राप्त होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोविड संक्रमणाचा कमी धोका असून ‘बी’ किंवा ‘एबी’ रक्तगट असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले.याआधी इटली, न्यूयॉर्क आणि चीन येथे करण्यात आलेल्या दोन इतर सर्वेक्षणांमध्येसुद्धा धुम्रपानाबाबत असेच निष्कर्ष निघाले होते

हा अभ्यास अहवाल मांडण्यासाठी 140 डॉक्टर, संशोधक आणि  सीएसआयआरच्या 40 प्रयोगशाळामधील लोक सहभागी झाले होते. तर या अभ्यासात 10,427 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. संशोधनात  कोरोना विषाणूविरोधी लढण्यासाठी आवश्यक प्रतीपिंडे (अँटी बॉडीज), कोरोना विषाणू आणि कोणत्या व्यक्तीमध्ये त्यांचा प्रतिकार करण्याची अधिक क्षमता असते याचा अभ्यास केला.अमेरिकेच्या ‘सेन्टर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन(सीडीसी)’ ने कोविड- 19 झालेल्या 7000 लोकांचे सर्वेक्षण केले आणि त्यातूनही धुम्रपान करणाऱ्यांमध्ये संसर्ग कमी होतो, असाच निष्कर्ष निघाला.धुम्रपान करणारे तसेच शाकाहार करणाऱ्या व्यक्तींना कोविड- 19 चा संसर्ग तुलनेने कमी होत असल्याचे निरीक्षण केंद्र सरकारच्या कौन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च म्हणजेच सीएसआयआरने मांडले आहे. नुकताच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असला तरी  निकोटीनचा कोरोना विषाणूवर होणाऱ्या परिणामावर अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे ही नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!