कोरोनानंतर आणखी एक संकट, अमेरिकेत ‘या’ आजाराची ६०० हून अधिक जणांना बाधा !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कोरोनाचा हाहाकार सुरू असताना अमेरिकेत आता आणखी एका आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. सायक्लोस्पोरियासिस हा परजीवी विषाणू हवाबंद सॅलडच्या खाण्याच्या सॅलडच्या पाकिटातून हा आजार पसरला असून ६०० हून अधिकजणांना बाधा झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून आजाराचा तपास सुरू केला आहे.
साइक्लोस्पोरा आजाराची सुरुवातीचे रुग्ण मे महिन्यात आढळले होते. त्यानंतर जुलै महिन्यात या आजाराशी निगडीत रुग्णांची संख्या वाढली. सायक्लोस्पोरियासिस हा परजीवी विषाणू सॅलडमध्ये आढळला आहे. सायक्लोस्पोरियासिस सूक्ष्म परजीवींशी संबंधित आजार आहे. या आजाराची लक्षणे भूक न लागणे, पोट फुगणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा आणि अतिसार अशी आहेत. ही लक्षणे साधारणत: पॅकेटमधील अन्न किंवा पाणी प्यायल्यानंतर एका आठवड्यांनी दिसतात. हवाबंद सॅलड पाकिटामध्ये आइसबर्ग लेटस, गोभी आणि गाजर असतात. फ्रेश एक्स्प्रेस या कंपनीने ही सॅलडची पाकिटे बाजार आणली होती. अमेरिकेतील अनेक मोठ्या रिटेल स्टोरमध्ये याची विक्री होते. जॉर्जिया, आयोवा, इलिनोइस, मिनेसोटा, पेन्सिल्वियासह ११ राज्यांमध्ये हा आजार पसरला आहे. रुग्णांच संख्या ६०० हून अधिक झाल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने लोकांना हवाबंद पाकिटामधील सॅलड न खाण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय रेस्टोरंट, किरकोळ विक्रेत्यांनाही ग्राहकांना सॅलड न देण्याची सूचना केली आहे. प्रशासनाकडून विक्रीस ठेवण्यात आलेल्या सॅलडच्या पाकिटांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.