पाडळसे उपसरपंच पदी खेमचंद कोळी यांची बिनविरोध निवड
भालोद ता,यावल (निखिल कोल्हे)। येथून जवळच असलेल्या पाडळसे येथील उपसरपंच रजनिकांत पाटील यांनी ठरल्या प्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजिनामा दिल्या नंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी खेमचंद कोळी यांची बिनविरोध निवड झाली.
ही निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी मा.सरपंच सौ.मिनाताई तायडे , कृ.ऊ.बा.मा.उपसभापती योगराज बऱ्हाटे पीक सोसायटी चेअरमन संतोष पाटील सामाजिक कार्यकर्ते देवेद्र पाटील , सामाजिक कार्यकर्ते मुंकुंदा कोळी , मावळते उपसरपंच रजनिकांत पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी पार पडलेल्या सभेमध्ये लोकनियुक्त सरपंच ज्ञानदेव दांडगे ग्रा.वि.अ. लिलाधर नहाले मावळते उपसरपंच रजनिकांत पाटील ग्रा.प.सदस्या स्वाती पाटील , सदस्या माधुरी पाटील , शोभा चौधरी, अनिता कुंभार , भावना कोळी योगिता कोळी चारुलता बऱ्हाटे , ग्रा.प.सदस्य प्रकाश भोई , ज्ञानेश्वर तायडे उपस्थित होते. यावेळी फैजपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हेंमत सांगळे , पोलीस नाईक किरण चाटे पाडळसे पोलीस पाटील सुरेश खैरनार , होमगार्ड संदीप सपकाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नव निर्वाचित उपसरपंच यांनी सांगितले की आगामी काळामध्ये गोर गरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणात घरकुल योजना राबवण्यात येईल तसेच गावातील सर्वंच वार्डामधील विकास कामे हाती घेणार येतील गावातील युवकाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहु असे सांगितले या निवडी बद्दल उपसरपंच खेमचंद कोळी यांचे भालोद येथील अमोल हरिभाऊ जावळे , प.स.सभापती सौ.पल्लवीताई चौधरी, जि.प.सदस्या सौ.सविता भालेराव यांच्यासह तालुक्यातील व गावातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.