भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक : निरव चोप्राने इतिहास घडवला
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
टोकियो, वृत्तसंस्था। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने इतिहास घडवला आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गोल्ड मेडल पटकावले आहे.
नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकला, तर 87.58 मीटरचा थ्रो नीरजचा सर्वाधिक होता. प्राथमिक फेरीत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रानं 86.65 मीटर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला होता. तसेच यंदाच्या ऑलिम्पिकमधले हे एकमेव सुवर्ण पदक आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.
दरम्यान ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.