मस्कावाद मधील दोन किराणा विक्रेत्यांना कोरोनाची लागण !
सावदा (प्रतिनिधी)। गावांतील आलेल्या कोरोना तपासणी अहवालात येथील दोन किरण दुकानदारांचे कोरोना तपासणी अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात एक सिम मधील तर एक बुद्रुक मधिल रहिवासी आहे.
गावांतील आलेल्या २ अहवालांमध्ये एक ५० वर्षीय पुरुष मस्कावाद सीम मधील आहे तर एक ५५ वर्षीय पुरुष मस्कावाद बुद्रुक मधील असून दोघेही किरण दुकानदार बाधित आढळून आले आहे. सदरील वृत्तास स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे