ताज्या बातम्यारावेर

रावेर तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख आज आणखी २२ रुग्ण कोरोना बाधित !

रावेर (प्रतिनिधी) । जिल्ह्यासह रावेर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसुन येत असून आज तालुक्यात तब्बल २२आणखी नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये रावेर व सावदा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.

रावेर तालुक्यात आज २२ कोरोनाचा बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे बाधित आढळलेल्या रुग्णांन मध्ये ५ रूग्ण हे शहरातील ४ रावेर व १सावदा येथील तर अन्य पिंप्री ६, रोझोदा २, गाते २, रसलपुर १, केर्‍हाळा १, वाघोदा १, चिनावल १ आणि विवरे १, अटवाडे १, खानापुर १, यामध्ये तालुक्यातील पिंपरी गावामध्ये आज सर्वाधीक रूग्ण आढळून आले असून याला तहसील प्रशासनाने दुजोरा दिला आहे. दरम्यान, एकाच दिवशी इतक्या जास्त प्रमाणात रूग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने प्रशासन खबरदारीच्या उपाय योजना करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!