भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

संत मुक्ताई तीर्थक्षेत्रासाठी १५ कोटीचा निधी ; आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुरावा

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | कोथळी येथील संत मुक्ताई समाधी स्थळाच्या रखडलेल्या बांधकामासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने संत मुक्ताई मंदिरासाठी तब्बल १५ कोटी रूपयांचा वाढीव निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असून येत्या ५ ते ६ दिवसांत निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागास करण्यात आला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथळी येथील संत मुक्ताई समाधी स्थळाच्या रखडलेल्या बांधकामासाठी वाढीव निधी मिळावा या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. या अनुषंगाने मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती. यात सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना वाढीव कामाचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले.

यावर मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसांमध्ये १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या बैठकीला संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई समाधी स्थळ कोथळीचे व्यवस्थापक हभप उध्दव महाराज जुनारे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील आदींसह वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!