भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

हिंगोणा येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू !

यावल(प्रतिनिधी)।

तालुक्यातील हिंगोणा येथील रहीवाशी वत्सलाबाई मनोहर वारके यांना सर्प दंश झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिंगोणा येथील वत्सलाबाई मनोहर वारके वय 52 हे दिनांक २ रोजी सकाळी 4 :45 मिनिटांनी चुलीवर पाणी तापवण्यासाठी उठले तसेच चूल पेटवण्यासाठी सरपण घेतले असता त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला सापाने चावा घेतला ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे उपचारार्थ नेण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णवाहिकेतून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती अधीक खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले परंतु सर्प अती विषारी असल्यामुळे त्यांचा वाटेतच मृत्यू झाला त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले त्यांच्या पश्चात पती 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!