भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

१८ वर्षांवरील सर्वांना १ मे पासून कोरोना लस घेता येणार- केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई ( वृत्तसंस्था )कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी संपूर्ण देशात १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरणाच्या मोठ्या मोहीमेला सुरुवात झाली.सुरवातीला पहिल्या टप्प्यात कोरोना लसफ्रंटलाईन वर्कर्सना व आरोग्य कर्मचारी याना दिली जात आहे. त्यानंतर दीड महिन्यानंतर १ मार्चला लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला.या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जातेय. त्यानंतर लागलीच एक महिन्यानंतर म्हणजेच १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली.

गेल्या अनेक दिवसा पासून १८ वर्षावरील सर्वांना ही लसदेण्यात यावी अशी सर्व स्तरातून केंद्र सरकार कडे मागणी होती त्याच पश्वभूमीवर आता देशातील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा वेगवान करत यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्राकडून मिळाली आहे. यासंदर्भात सातत्याने देशात मागणी केली जात होती. देशातील सध्याची परिस्थिती पाहता आता हिच मागणी केंद्राने मान्य केली आहे. यामुळे देशातील कोरोना लसीकरणाचा वेग आणखी झपाट्याने वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!