चिंताजनक; जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा ७०००चा टप्पा पार !
जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात ३०५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल ३०५ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल भुसावळ २८, पारोळा २२, जामनेर २१, चाळीसगाव १६, चोपडा १३, पाचोरा १३, जळगाव ग्रामीण ११, रावेर १०, मुक्ताईनगर ९, बोदवड ७, धरणगाव ७, एरंडोल ४, अमळनेर ४, यावल ३, भडगाव २ व अन्य जिल्ह्यातील १ असे रूग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ७२७५ इतकी झाली आहे. यातील ४४१८ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच १८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ३७१ रूग्णांचा मृत्यू झाला असून २४८६ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.