जळगाव जिल्ह्यात आज ५२९ रुग्णांची कोरोनावर मात तर ६०५ नविन बाधित रुग्ण !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ६०५ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित मुक्ताईनगर तालुक्यातील आणि जळगाव मधील आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ६०५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १२९ रूग्ण हे मुक्ताईनगर तालुक्यातील आढळून आले आहेत. याच्या खालोखाल जळगाव शहर ११८, जळगाव ग्रामीण ५४, भुसावळ ४६, अमळनेर १९, चोपडा ५०, पाचोरा २३, भडगाव १, धरणगाव १६, यावल २९, एरंडोल ५३, जामनेर ६, रावेर ९, पारोळा १४, चाळीसगाव ३०, मुक्ताईनगर १२९, बोदवड ४ व दुसर्या जिल्ह्यांमधील ४ असे एकुण ६०५ रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २२९२३ इतकी झालेली आहे. यातील १५९८२ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५२९ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ८ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७३७ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ६२०४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.