मुक्ताईनगर येथे नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट या महत्वाकांशी प्रकल्पला मंजूरी -आ.पाटील याच्या प्रयत्नांना यश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)।:- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात शेकडो रुग्णांची भर पडत आहे. ऑक्सिजनची कमतरता हे कोरोना रुग्णामधील एक प्रमुख लक्षण सद्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यातच मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय हे कोरोना रुग्णांना संजीवनी ठरत असून येथे कोरोना अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची प्रचंड वर्दळ असते .यासाठी येथे यापूर्वीच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून येथे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रित्या अतिदक्षता विभाग व हॉस्पिटलचे नूतनीकरण करण काम युद्धपातळीवर सुरू आहे.अशात येथे दिवसेंदिवस रुग्ण संख्या प्रचंड वाढत असल्याने आमदारांनी लोकवर्गणीची संकल्पना राबवत येथे ड्युरा सिलेंडर आणून दिले त्यामुळे येथे 10 व्हेंटिलेटरवर , 10 बाय पॅप मशीन व 52 ऑक्सिजन वरचे असे एकूण 72 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा धर्तीवर एक यशस्वी रुग्णालय ठरत असून आता जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा पडत असल्याने सिलेंडर वेळेवर भरून मिळत नसल्याने या ठिकाणी रुग्ण इतरत्र हलविणे यासाठी आरोग्य प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडते. ही परिस्थिती पाहता येथे नॅचरल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. या मागणीला पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी हिरवा कंदील मिळाला असून याबाबत मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई शाखा यांचे मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाला पत्र प्राप्त झाले आहे.
आता लवकरच येथे नॅचरल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे खूप मोठ्या अडचणी दूर होणार असून रुग्णांना मुबलक असे ऑक्सिजन मिळणार आहे .या प्लांट मध्ये 250 ते 300 नॅचरल ऑक्सिजन सिलेंडर तयार होतील जेणेकरून 3 हजार ते 3.5 हजार क्षमतेचे ऑक्सिजन नैसर्गिक वातावरणातून निर्मिती केली जाणार आहे . येथील प्लांट मधून मुक्ताईनगर , बोदवड , सावदा , रावेर आदी तालुक्यात देखील मुबलक ऑक्सिजन पुरवठा होईल .एक प्रकारे परिसरासाठी संजीवनी ठरणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कर्तव्याची जोड असणार आहे हे निश्चित ..