यावल तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातुन मिळालेल्या तांदुळात प्लास्टिक सदृश्य तांदुळ? तांदूळ प्लास्टिकचे की ” फोर्टीफाइड चावल”?
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l कोरोना कळापासून राज्यात पिवळ्या व केशरी रंगाच्या शिधापत्रिका लाभार्थ्यांना धारकांना, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य वितरित केले जात आहे. यात प्रामुख्याने तांदूळ व गव्हाचा समावेश आहे. त्याच प्रमाणे यावल तालुक्यात सुद्धा रेशन दुकानावर धान्य मोफत वाटप केले जात आहे. यावल तालुक्यात स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटपात देण्यात आलेल्या तांदुळामध्ये प्लास्टिक सदृश्य तांदुळ आढल्याची माहिती मिळाली आह. परंतु हे तांदूळ जास्त पोषक तत्वे असलेले “फोर्टीफाइड चावल” नामक तांदूळ असल्याची माहिती मिळाली
यावल तालुक्यातील विविध स्वस्त धान्य दुकानातुन लाभार्थी शिधा पत्रीका धारकांना पुरवठा यंत्रणेकडून वितरीत करण्यात येत असलेल्या तंदुळामध्ये प्लास्टिकचे तांदुळ भेसळ वितरीत करण्यात येत असल्याची ओरड धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांना कडून करण्यात येत आहे. या तांदूळात प्लास्टिकचे तांदूळ भेसळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्याचही सांगण्यात आल.
दरम्यान, प्लॅस्टिकच्या बनावट तांदळाबाबत अधिक माहिती घेतली असता हे तांदूळ प्लास्टिकचे बनावट नसून “फोर्टीफाइड चावल”म्हणून शासनाने तांदुळावर प्रक्रिया करून अधिकृत पणे त्यात टाकली असल्याचं सांगितलं गेलं. म्हणजे ही तांदूळ आरोग्यास अपायकारक नसून पोषक असल्याचं सांगितलं गेलं. या तांदुळात सामान्य तांदूळ पेक्षा जास्त पोषक तत्व आहेत. या तांदळाला “फोर्टीफाइड चावल” असे म्हंटले जाते. आणि हेच तांदूळ आता भविष्यात रेशन दुकानावर लाभार्थी शिधा पत्रिका धारकांना देण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यात शासनाव्दारे संचलीत १२४ अशी स्वस्त धान्य वितरण करणारी दुकाने असुन या स्वस्त धान्य दुकानातुन प्रतिमाह १० हजार ७२६ अंत्योदय आणी ३२ हजार ९७४ अशी एकुण ४३ हजार ७०० अशा विविध ठिकाणाहून गोरगरीब व गरजू शिधा पत्रिका धारकांना धान्य वितरण करण्यात येत असते.
परंतु आता नुकत्याच वाटप करण्यात आलेल्या तांदुळात प्लास्टिकचे बनावट तांदुळ भेसळ केलेले आढळून आल्याचं सांगण्यात आलं. या बाबत पत्रकारांनी यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझिर कर यांना विचारले असता, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी या प्लास्टिक तांदुळा बद्दल पत्रकारांना माहिती दिली, सदर प्लास्टिकचे तांदुळ भेसळ केलेले तांदुळ गोंदीया या ठिकाणाहुन राज्यातील विविध धान्य दुकात वितरणासाठी येत असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी आपण या संदर्भात प्रत्यक्ष धान्य गोदामावर जाऊन वितरणासाठी आलेल्या तांदुळाची तपासणी करणार असल्याची माहिती देऊन याची आपण चौकशी करू, अशी माहिती पत्रकारांशी बोलतांना दिली .
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा