ताज्या बातम्यायावल

यावल तालुक्यात 3 रुग्णांना कोरोनाची बाधा !

यावल (प्रतिनिधी)। महाराष्ट्र सह जळगांव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात यावल तालुका सुद्धा सुटलेला नाही, यावल तालुक्यात सुद्धा दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज आलेल्या अहवालांमध्ये तालुक्यात ३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज  साकळी येथील ३० वर्षीय महिला, भालोद येथील ४७ वर्षीय पुरुष तर चिंचोली येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश असून तालुक्यातील आता पर्यंत ३३५ रुग्ण बाधित आढळून आले आहे, तालुक्यात बाधितांची दिवसागणित वाढती संख्या चिंतेत भर घालणारी असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बऱ्हाटे यांनी दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!