रावेर तालुक्यातील कर्जोद गावामध्ये लहान बालकास डेंग्यूची लागण
रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील कर्जोद गावामध्ये लहान बालक डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की,तालुक्यातील वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या कर्जोद गावामध्ये एक ८ वर्षीय बालकाला मागील दोन दिवसांपासून थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसू आल्याने रावेर येथील खाजगी रुग्णालयात तपासणी केल्याअंती सदरील बालकास डेंग्यू झाल्याचे आढळून आले असून गावातील आणखी काही लोकांना ताप थंडी तसेच डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसून येत आहेत. डेंग्यू चा आजार डासांमार्फत होतो त्यामुळे आरोग्य विभागा कडुन गावांतील घाणीचे साम्राज्य दूर करून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी गावपातळीवर केली जात आहे.