भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यायावल

लग्नाची माहिती लपवल्या प्रकरणी पोलिस पाटलांचे निलंबन !

यावल,प्रतिनिधी(सुरेश पाटील): तालुक्यातील म्हैसवाडी गांवात एक विवाह समारंभ कार्यक्रम 70 ते 80 लोकांचा जनसमुदायासह कोणतेही सोशल डिस्टंनसिंग न पडता आणि मास्क न लावता पार पडला. विवाह पासून म्हैसवाडी गांवात संसर्गजन्य आजाराने 16 ते 17 लोकांना बाधा झाल्याने तसेच विवाहामध्ये 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याची माहिती म्हैसवाडी येथील महिला पोलीस पाटील हिने पोलिसांना उशिराने दिल्याच्या कारणावरून प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी महिला पोलीस पाटील हिस निलंबित करीत आहे असा आदेश दिनांक 8 जुलै 2020 बुधवार रोजी दिल्याने आणि विवाह संभारंभ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्ह्यातील पोलीस पाटील कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील आदेशा नुसार दिनांक 7 जुन 2020 पासून लग्नसमारंभासाठी फक्त 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे, असे असताना यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे मच्छिंद्र जयसिंग चौधरी यांचा मुलगा विक्की व त्याचा भाऊ गोरख जयसिंग चौधरी यांचा मुलगा जितेंद्र यांचा विवाहास 70 ते 80 लोकांचा जनसमुदायासह कोणतेही सोशल डिस्टंसिंग न पाळता व मास्क न लावता पार पडला दोघांच्या विवाहापासून म्हैसवाडी या गांवात या संसर्गजन्य आजाराने 16 ते 17 लोकांना बाधा झाली, विवाहामध्ये 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्यास पोलीस पाटील यांनी पोलिस यंत्रणेला माहिती देणे अपेक्षित आहे, परंतु वर नमूद दोघं विवाहास 70 ते 80 लोक उपस्थित होते हे माहीत असताना सुद्धा सदर कार्यक्रमावर कार्यवाही करणेबाबतची कोणतीही माहिती सौ. प्रफुल्ला गोटूलाल चौधरी पोलीस पाटील म्हैसवाडी यांनी पोलिस यंत्रणा व महसूल यंत्रणा यांना माहिती दिलेली नाही.

याबाबतीत म्हैसवाडी गांवातून पोलिस यंत्रणेला माहिती पडल्यानंतर म्हैसवाडी पोलीस पाटील सौ. प्रफुल्ला गोटूलाल चौधरी यांनी उशिराने दिनांक 2 जुलै 2020 गुरुवार रोजी भाग 6 गु.र.नं. 29 / 2020 भा.द.वी. कलम 188 , 270 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस पाटील सौ. प्रफुल्ला गोटुलाल चौधरी यांनी कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारास वेळीच प्रतिबंध न करता व उशिराने गुन्हा दाखल केला म्हणून त्यांच्यावर फैजपूर पोलीस स्टेशन मध्ये वरील नियमानुसार तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशाचा भंग करणे तसेच पोलीस पाटील या पदावर कार्यरत असताना गावातील माहिती पोलीस स्टेशनला वेळेवर न देणे व आपल्यावर दाखल गुन्हे यावरून आपण आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न होते या कारणावरून तसेच महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979 नियम 4 च्या पोटनियम ( 1 ) तसेच अ.क्र. 2 चे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 11 अन्वये प्रधान केलेल्या शक्तीचा वापर करून तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार सौ प्रफुल्ला गोटू लाल चौधरी पोलीस पाटील महेश वाडी तालुका यावल जिल्हा जळगाव यांना या आदेशाचे दिनांका पासून पुढील आदेश पावतो तत्काळ निलंबित करीत आहे असा आदेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिला. माहितीसाठी आदेशाच्या प्रती कार्यकारी दंडाधिकारी यावल, सहाय्यक पोलीस निरीक्षक फैजपूर पोलीस स्टेशन, यांच्यासह यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील महिला पोलीस पाटील सौ. प्रफुल्ला गोटूलाल चौधरी यांना देण्यात आलेल्या आहेत. प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या कारवाईमुळे यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पोलीस पाटील व महसूल कार्यक्षेत्रात आणि पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!