भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

वाघोदा येथील कमलाकर माळी यांचा प्रजासत्ताक दिनी अनोखा उपक्रम….

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कमलाकर माळी यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी एक अनोखा उपक्रम राबवला .

उपक्रम असा की संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांच्या 101 डिजिटल प्रतिमा त्यांनी मोफत भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबवला. व त्या प्रतिमा पोस्ट आँफीस भारतीय डाक घर या तर्फे घरपोच त्यांच्या पत्त्यावर पोहोचविल्या त्यांचा मानस असा होता की महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा यांचे विचार समाजमनात पोहचावे यासाठी त्यांनी 101 फोटो समाजात वाटण्याचा निर्णय घेतला आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर या प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या पत्यावर पोहच केले .प्रथम त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांना फोटो इच्छुक असतील त्यासाठी त्यांचे पत्ते मागवले तर त्या डिजिटल प्रतिमासाठी मुंबई पुणे नाशिक सोलापूर.शहादा.नंदुरबार अहमदनगर, कोल्हापूर, राहुरी, बीड, जालना, औरंगाबाद, जळगाव, रावेर, येथून फोटोसाठी मागणी आली आणि त्यांनी ते पूर्ण केले त्या पत्त्यावर त्यांनी त्या प्रतिमा पोस्टामार्फत पोहोचवले विशेष म्हणजे ग्रामस्थांतर्फेच पोस्टामार्फत शुभारंभ केला .त्यावेळी ग्रा पं सदस्य संजय माळी. पोस्ट मास्टर संजय महाजन.गोकुल महाजन.जिवन बुगले.विलास महाजन.प्रमोद गावंडे. हे उपस्थित होते.त्यांना खुप प्रतिसाद ही मिळाला अशा आगळावेगळा उपक्रम केल्यामुळे कमलाकर माळी यांचे समाजात यांचे कौतुक होत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!