संकट कायम; जळगाव जिल्ह्यात आज २६१ रुग्ण कोरोना बाधित !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २६१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २६१ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ८४ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल आज जामनेर ११, चाळीसगाव ९, रावेर १९, भुसावळ १४, आणि मुक्ताईनगर २४ , जळगाव ग्रामीण ५, अमळनरे ९, चोपडा ४०, पाचोरा ३, धरणगाव १६, एरंडोल २, पारोळा २, बोदवळ १, भळगाव ५, यावल ११ इतर ६ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.