भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

सावदा इत्तेहाद एज्युकेशन सोसा. संचालक सलीम खान अ. रज्जाक खान यांची हकालपट्टी करा- पालक व नागरिंकाचे निवेदन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा  (प्रतिनिधी)। सावदा येथील इत्तेहाद सोसायटी संदर्भात नविन इमारत बांधकामा बाबत संस्थेत असलेले संचालक तथा उपाध्यक्ष सलीम खान अ रज्जाक खान हे स्वत: इमारत बांधकाम पाडण्या करिता समाजाच व विद्यार्थी हिताचा विचार न करता मा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात गेले असता त्यात दि 22/02/2021रोजी मा उच्च न्यायालय ने त्यांनी याचिकेत  मांगणी केल्या प्रमाणे त्यांना समजावुन सांगीतले आहे तसेच त्यांनी दाखल केलेली याचिका कोणतेही दंड न आकारता  (Disposed) रद्द केली, फेटाळली, बंद केली आहे,असे निवेदन नागरिकांनी इत्तेहाद सोसायटीला दिले असून त्याच प्रमाणे त्यात असेही म्हटले आहे की,

अशी मानसिकता ठेवुन त्यांनी समाज हिता चे विचार न करता निर्माण करण्या ऐवजी विनाश करण्याचे ठरविलेले दिसते पत्रकार परिषद घेवुन त्यानी या बाबत स्वत: कबुली दिली आहे की ते त्यांचे व्यैक्तिक वादावरुन व त्यांच्या द्वेश मुळे समाजाचे नुकसान करण्याच्या भुमिकेत आहेत. संस्थेत राहुन 30 वर्षाहुन अधिक काळा पासुन शाळेला इमारत नव्हती, शाळा पडाऊ व पतरी इमारत मध्य दोन शिफ्ट मध्ये सुरु होती विद्यार्थ्यांना फार त्रास सहन करावा लागत होता कोणतीही सुविधा नव्हती, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नव्हते , मुलांसाठी सुविधा नव्हती, माजी अध्यक्ष व यांनी यांचे हाती सत्ता असतांना कोणतीही प्रगती केली नाही उलट वेळकाडु पणा केलेला आहे, या संदर्भात गावातील काही समाजसेवक नागरिकांनी गैर समजातून इमारत बांधकामा बाबत नगर पालिकेत तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने नगर पालिकेने यांना सुचना देऊन खुलासा मांगीतला होता याच संदर्भात त्यांनी संस्थेला परवानगी बाबत न विचारता उलट जवाब नोंंदवीले तिथेच थांबले नाही इमारत बांधकाम तोडण्या करिता मा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात पहोचले तिथे त्यांची याचिका निकाली काढण्यात आली आहे व सावदा येथील तक्रार दारांनी शाळा, विद्यार्थी हितासाठी त्यांच्या तक्रारी मागे घेतल्या आहे व ते आता संस्थेला विकासासाठी साथ देत आहे याच राग येवुन श्री सलीम खान निर्माण ऐवजी विनाश करण्यासाठी उत्सुक झाले दिसुन येत आहे. अशीच मानसिकता मुळे त्यांना संस्थेत मान सम्मान मिळत नाही ते उलट सुलट आरोप करुन संस्थेला अडचणित आण्ण्याचे कार्य नेहमीच करत असतात त्यांनी व माजी अध्यक्षांनी 5नोव्हेंबर 2018 ला त्याच जागेवर इमारत बांधकामाठी भुमिपुजन कार्यक्रम मा मंत्री एकनाथ रावजी खडसे यांचे हस्ते केले होते त्या वेळेला परवॎनगी घेतलि होती काय?काम का बंद केले ? 30 वर्षात तुम्ही इमारत का बांधली नाही? शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले तर तुम्ही बांधु शकाल का ?

समाजाचे नुकसान तुम्ही भरुन काढणार का?नगर पालिकेने यांची मांगणी फेटाळुन लावावी अशी प्रतिक्रिया नागरिकांची आहे तसेच समाजाहिता साठी, विद्यार्थ्याीहिता साठी ते आता घातक असुन त्यांची संस्थेमधुन संचालक व उपाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करावी गावात यांचा बद्दल संतापाची लाट पसरली आहे अशे लेखि निवेदनात नागरिकांनी दिले असून निवेदनावर ४० ते ५० लोकांच्या सह्या आहेत या बाबत संचालक मंडळा कडुन सांगण्यात आले की,या बाबत लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असुन अधिक बोलणे टाळले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!