अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनतर्फे महादेवमाळ येथे ४० विध्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
भुसावळ। अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या एक दुर्वा समर्पणाची उपक्रमा अंतर्गत शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे.त्यात चवथ्या दिवशी भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथे ४० विध्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगलाल तवर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदिप सोनवणे,शिक्षण तज्ञ ताराचंद जाधव,उषा फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे ,माजी गस संचालक योगेश इंगळे,पांडुरंग महाजन,मुख्याध्यापक विजय पाटील हे होते.सुत्रसंचालन उषा फाउंडेशनचे सचिव जिवन महाजन यांनी केले.प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी तर आभार समन्वयक निवृत्ती पाटील यांनी मानले.
अंतर्नादच्या माध्यमातून आता पर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती अध्यक्ष संदिप पाटील यांनी दिली आणि भविष्यातील अंतर्नादच्या विध्यार्थ्यान साठीच्या योजनान विषयी माहिती दिली.प्रकल्प सह समन्वयक भूषण झोपे,निलेश पाटील,दिपक सुरवाडे,रवींद्र पढार,सौरभ जावळे हे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते पाटी-पेंसील,४ वह्या,पट्टी,पेंसील – खोडरबर,पेन, रंगपेटी असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
लाख मोलाची मदत–
अंतर्नाद आणि उषा फाऊंडेशनने हि जी मदत केली आहे ती जरी छोटीशी असली तरी ही मदत आमाच्या आदिवासी बांधवांच्या मुलांन साठी लाख मोलाची आहे.यातूनच प्रेरणा घेउन उद्याचे मोठे प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील हा विश्वास मला आहे.भविष्यातही अंतर्नादने यातील हुशार विधार्थ्याना शिक्षणासाठी मदत करावी हिच अपेक्षा आहे.आमचे विध्यार्थी तुमची ही मदत कधीही विसरणार नाहीत असे भुसावळ शिक्षक पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे यांनी प्रतिपादन केले.