घरकुलाची थकीत रक्कम द्या! नाहीतर विकण्याची परवानगी तरी द्या ! सावदा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा (प्रतिनिधी)। शासनाचे घरकुल बांधणे साठी घरकुल योजने अंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते त्या योजनेचे नागरिकांना अद्याप थकीत रक्कम मिळाली नसल्याने सदर लाभार्थीना थकीत रक्कम त्वरित मिळावी अन्यथा सदर घरकुल विकण्याची परवानगी मिळावी अशी मागणी एका निवेदना व्दारे सावदा मुख्याधिकारी सैराभ जोशी यांचे कडे केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की सावदा शहरातील नागरिकांनी घरकुल बाधण्यास मदत व्हावी म्हणून घरकुल योजने अंतर्गत अर्थ साहाय्य मिळावे म्हणून अनेक गोरगरीब नागरिक यांनी अर्ज केले यात ज्यांना घरकुल मंजूर झाले त्यांनी उधार उसनावार घेऊन घरकुल बाधणी सुरु केली व त्यासाठी ते भाड्याचे घर घेऊन राहू लागले मात्र सदर घरकुलाचे काम कोठे पूर्णत्वास तर कोठेअपूर्ण असल्याने मात्र आता पैसे नसल्याने ते बाधकाम ठप्प पडले आहे,
नगरपालिकाकडे असलेली घरकुल ची प्रत्येकी सुमारे ९०००० हजाराची रक्कम अद्याप त्यांना भेटली नसून यामुळे सदर नागरिक आर्थिक संकटात सापडले आहे घर बाधण्यास पैसे नाही, दुसरीकडे घर भाडे वाढत आहे तर पालिके कडील थकीत रक्कम पैसे मिळत नसल्याने सदर नागरिक अडचणीत सापडले असून या नागरिकांनी दि २७ रोजी नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून सदर थकीत रक्कम लवकरात लवकर द्यावी अन्यथा आम्हास सदर घरकुल विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी एका निवेदना व्दारे केली असून यावर अकबर गनी मन्यार, चुडामण वाघुळदे, विकास भोरटक्के, किशोर वारके, विकास, विकास बावणे, राजेंद्र राणे, सुलतान खान सिराज खान, यांचे सह असंख्य लाभार्थीच्या स्वाक्ष-या आहेत