भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

चिंताजनक; सावद्यात कोरोना बाधितांचे अर्धशतक पुन्हा 4 रुग्ण बाधित तर एकाचा मृत्यू!

सावदा (प्रतिनिधी) । काल रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणी अहवालात सावदा येथील संशयित 7 रूग्णांचे स्वॅब काही दिवसांपूर्वी तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील 4 रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले असुन तीन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सदरील वृत्ताने परिसरात खळबळ उडाली असुन आता शहरात एकुण 50 रूग्ण कोरोना बाधित झाले आहे. अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी  दिला आहे.

सदरील मृत 64 वर्षीय रुग्ण जळगाव येथे उल्हास पाटील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत होता रात्री उशिरा आलेल्या अहवाल अंती कोरोना बाधित रुग्ण मृत पावला असुन नवीन 4 बाधित रुग्ण त्याच्याज घरातील आहेत. त्यामध्ये एक 8 वर्षीय लहान मुलगा , महिला एक 54 वर्षीय ,एक 30 वर्षीय व एक 32 वर्षीय पुरुषांचा समावेश असुन सर्व गराडी बुव्वा चौक बुधवार पेठ येथील रहिवासी आहे. परिसर प्रशासनाकडून आधीच सील करण्यात आला असुन सदरील वृत्ताने परिसरात चिंता पसरली असुन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 50 झाली असुन त्यात 8 मयत, 11 उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!