निंबोल येथील नागरिकांचा कोविड अँटीजन तपासणी ला उत्स्फूर्त प्रतिसाद…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर ता.रावेर(प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील ऐनपुर येथून जवळ असलेल्या निंबोल गावात कोविड अँटीजन टेस्ट कॅम्प प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर मार्फत ग्रामपंचायत आवारात घेण्यात आला यात एकूण 129 लोकांनी आपली तपासणी केली त्यात 4 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले .आजचा नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहून असे वाटते की सर्व गावकऱ्यांनी मिळून ठरवले तर आपले गाव लवकरच कोरोना मुक्त होऊ शकते कारण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी आहे ,पण या कडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही शासनाने दिलेले निर्देशाचे पालन करावेच लागेल
आजच्या तपासणीत किराणा दुकानदार, कृषी साहित्य विक्रेते, पिठगिरणी चालक ,मेडिकल ,भाजीपाला विक्रेता जवळपास गावातील सर्वप्रकारची व्यवसायिक मंडळी यांनी तपासणी केली .
या कामी ऐनपूर आरोग्यकेंद्राचे डॉक्टर व स्टाफ ,स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता गावासाठी आरोग्यदूत बनलेल्या आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी सेविका मदतनीस, ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ,पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले.