भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

महत्वाची बातमी : कडक लॉकडाऊनची आज घोषणा? मुख्यमंत्री नवीन नियमावली जाहीर करणार !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (वृत्तसंस्था)। राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, ऑक्सिजनची कमतरता आणि औषधांचा तुटवडा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत झाली. या मागणीला उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दाखवली. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, बुधवारी यासंदर्भातील घोषणा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या घोषणेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

लॉकडाऊन किती दिवसांचा जाहीर करायचा, कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, सार्वजनिक वाहतुकीबाबत काय करायचे, गेल्या वर्षीप्रमाणे जिल्हा बंदी लागू करायची किंवा कसे? याबाबत रात्रीच चर्चा होऊन मार्गदर्शक सूचना जारी होणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. लॉकडाऊन लागू करताना कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, कोणत्या बंद करायच्या याबाबत आज निर्णय होईल. आजच्या निर्णयानुसार मार्गदर्शक सूचना जारी झाल्यानंतर कालच्या सूचना रद्द होतील, असे परब यांनी सांगितले.तर कठोर निर्बंध, विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी लागू करूनही रुग्णसंख्या वाढत असल्याने महाराष्ट्रात काही तासात लॉकडाऊन जाहीर होऊ शकेल, परदेशी लस खरेदीसाठी केंद्राला मागणी करणार राज्यातील लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला परदेशातून कोरोना प्रतिबंधित लस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारे परवानगी द्यावी अशी मागणी मंत्रिमंडळात झाली. सर्व मंत्री एकमताने केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!