लोहारा ते सावखेडा रस्त्यातील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याला पाँझर तलावाचे स्वरूप.
रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील लोहारा ते सावखेडा रस्त्याचे तीन तेरा नऊ अठरा वाजले असल्याने संपुर्ण रस्त्त्याचे मोठमोठ्या खड्यांत रुपांतर होऊन हा रस्ता अपघातास कारणीभुत ठरत आहे.
रहदारीला खुप मोठा अडथळा निर्माण होऊन या रस्त्याच्या मोठमोठ्या खड्यांमधे फैजपुर इरिगेशन चे एअर सिमेंट पाईप जागोजागी लिकेस असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आणि हे पाणी शेतकऱ्यांच्या ,मजुरांच्या रहदारीला खुप मोठा अडथळा निर्माण करीत असुन, वाहने तर सोडाच, माञ पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे, लोहारा ते सावखेडा रस्त्याने प्रवास करणे,पायी चालणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे,जीव धोक्यात घालुन शेतकरी,मजुरांना या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे, या रस्त्यात मोठमोठे खड्डे तर आहेतच, परंतु या खड्यांमधे पांझर तलावासारखे डोह निर्माण झाले आहेत,त्याचबरोबर या रस्त्याने प्रवास नेमका कुठूुन करायचा खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच समजेनासे झाले आहे , या रस्त्याबाबतीत परिसरातील शेतकरी व मजुरांमधे संबधित विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांबाबतीत नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या २५ ते ३० वर्षा पासून हा रस्ता तयार करण्यात आलेला नसून पूर्वी हा रस्ता २० फुटाचा होता आज हा रस्ता १०ते १२ फुटाचा राहिला आहे या रस्त्याच्या संपुर्ण दयनीय अवस्थेकडे संबधितानी गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याचे ताबडतोब डांबरीकरण करावे. अशी रास्त स्वरुपाची मागणी लोहारा,सावखेडा परिसरातील जनतेकडुन,शेतकऱ्यांकडुन केली जात आहे,