भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

muktainagar

११ च्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी बनविले “चार्ज शेअर ॲप” वाहन धारकांसाठी एक वरदान

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.प्रतिनिधी | अकोला येथील एलआरटी कॉलेज मधील शार्क टैंक अशा कम्पटीशन साथी ४ डी च्या वाणिज्य सीए शाखेचे शिक्षण घेत असलेल्या बाहेती एज्युकेशन क्लासेसच्या ११ विद्यार्थी विद्यार्थिनींनी चार्ज शेअर हे ॲप बनवलेले असून चार्ज शेअर मुळे कंपन्यांना ई व्ही वापरणे सोपे होणार आहे. याआधी हे ॲप अमेरिका येथे वापरले जात होते आता हे ॲप भारतामध्ये सुद्धा वापरले जाणार आहे. यशस्वी चार्जशेअर ॲप बनविणाऱ्या टीम मध्ये मुक्ताईनगर येथील आर्या मुकेश महल्ले या विद्यार्थिनीचा समावेश आहे.

चार्ज शेअर हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी ( ई व्ही) एक स्मार्ट चार्जिंग प्लॅटफॉर्म आहे. जसे मोबाईल रोमिंगमध्ये एकाच सिमने वेगवेगळ्या नेटवर्कचा वापर करता येतो, तसेच चार्ज शेअर मुळे ई व्ही ड्रायव्हर अनेक चार्जिंग कंपन्यांचे स्टेशन एका ॲप द्वारे वापरू शकतात. चार्ज शेअर सर्व चार्जिंग नेटवर्कला एकत्र जोडते. दुचाकी, चारचाकी, ट्रक चालकांना फक्त एक ॲप किंवा आर एफ आय डी कार्ड वापरून कुठल्याही उपलब्ध चार्जिंग स्टेशनवर गाडी चार्ज करता येते. चार्ज करण्यासाठी 30 ते 45 मिनिट लागतात. 120 किलोमीटर अंतरामधील चार्जिंग स्टेशन दाखवले जाते यामुळे वेळेची बचत व खर्च वाचतो. चार्ज शेअर मुळे कंपन्यांना ई व्ही वापरणे सोपे होते आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होते.

चार्ज शेअर ॲप चे मुख्य फायदे ….
एकच ॲप , अनेक चार्जिंग स्टेशन,
एकत्रित बिलिंग आणि सोपे पेमेंट,
ए आय द्वारे योग्य चार्जिंग स्टेशनची माहिती,
वेळ आणि खर्चाची बचत,
ई व्ही फ्लीटचे व्यवस्थापन अधिक सोपे हे मुख्य फायदे आहेत.

ई व्ही फ्लीट कंपन्यांना वेगवेगळ्या चार्जिंग स्टेशनसाठी अनेक ॲप्स, पेमेंट आणि बिल्स सांभाळावे लागतात या समस्या होत्या .आता या समस्या दूर होतील.

चार्जशेअर ॲप तयार बनविण्यामध्ये या विद्यार्थ्यांचा आहे समावेश….
आर्या महल्ले ,वैष्णवी पाटिल, अदिति लड्डा ,भूमिका अग्रवाल, वेदिका पोहरें , सई जोरगेकर ,हनी वोरा,
रुद्र जैन ,ओम वाघ ,कार्तिक सोनी ,दक्ष रांडद.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!