तोल गेल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू, यावल तालुक्यातील घटना
यावल, मंडे टु मंडे न्युज |विहिरीत डोकावत असताना अचानक तोल जावून पडल्याने यावल तालुक्यातील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळावर रोजी घडली.
यावल तालुक्यातील शिरसाड येथील राजेश रमेश भिलाला (वय २०) हा त्याच्या घरासमोरील विहिरीत मंगळवारी डोकावत पहात असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मयत झाला. नागरिकांनी तत्काळ त्याला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. रमेश भिलाला याच्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


