फोन कॉल उचलला नाही म्हणून ३२ वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार, यावल तालुक्यातील घटना
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बत्तीस वर्षीय महिलेला तरुणाने कॉल केला असता महिलेने कॉल न उचलल्याने जाब विचारत संतापात शिवीगाळ करत महिलेच्या पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार करत गंभीर दुखापत केल्याची घटना यावल तालुक्यातील किनगाव येथे घडली.
यावल तालुक्यातील किनगाव येथील मनीषा संदीप पाटील वय ३२ वर्ष. या महिलेने यावल पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, मुकुंदा गणेश भंगाळे. वय ३२ वर्ष. रा. डांभूर्णी, ता.यावल . हा तरुण महिलेच्या घरात येवून, मी तुला मोबाईल वर कॉल केला, तू माझा कॉल कीआ उचलत नाही? असा प्रश्न करत जाब विचारला तेव्हा महिलेने संगितले की, माझा मोबाईल सायलेंट होता,व मी बाहेर गेली होती, असे सांगितले असतानाही तरुणाने महिलेशी वाद घालत शिवीगाळ केली आणि संतापात महिलेच्या उजव्या पायाच्या मांडीवर धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. या संदर्भात जखमी महिलेने दिलेल्या तक्रारी वरून यावल पोलिस स्टेशनला मुकुंदा गणेश भंगाळे.वय ३२ वर्ष. रा. डांभूर्णी, ता.यावल. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.