भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

खासगी कार्यालयातून होणार आता दस्तनोंदणी, दस्तनोंदणीसाठी द्यावे लागणार अतिरिक्त सेवा शुल्क

पुणे, मंडे टु मंडे न्युज | राज्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ६० खासगी दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या ६ महिन्यांत ही कार्यालये सुरू होणार आहेत. ही कार्यालये राज्यात पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबई या शहरात सुरू होणार आहेत. दस्तनोंदणीसाठी ग्राहकांना अतिरिक्त ६ हजार रुपये सेवा शुल्क म्हणून द्यावे लागणार आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, दस्तनोंदणीची सुविधा अधिक गतिमान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या निर्णयानुसार राज्यात ६० खासगी कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या कार्यालयांमधून पासपोर्ट कार्यालयात देण्यात येणाऱ्या सुविधा मिळणार आहेत. या सुविधा देताना नागरिकांकडून अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क आता जास्तीत जास्त ६ हजार रुपये आकारण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. कमीत कमी दर आकारणाऱ्या संस्थेला हे काम देण्यात येणार आहे, .

या कार्यालयात कोण कोणत्या सुविधा मिळणार?
या खासगी दस्तनोंदणी कार्यालयांमधून बैठकव्यवस्था, एसी, चहापानाचा समावेश आहे. शहरांमधील ग्राहक अशा सुविधांच्या मोबदल्यात अतिरिक्त पैसे देण्यास अनुकूल असतात. त्यामुळे सुरुवातीला पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर या सहा मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा देणारी ३० कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.

काम मिळालेल्या संस्था पुढील सहा महिन्यांत कामे पूर्ण करून कार्यालये सुरू करणार आहेत. मोठ्या शहरांमधील कार्यालये सुरू झाल्यानंतर त्यापुढील दीड वर्षात ही कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.या कार्यालयांत नोंदविण्यात येणाऱ्या दस्तांमधून राज्य सरकारला नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काच्या रकमेसह किमान सहा हजार रुपयांचे अतिरिक्त शुल्क मिळणार आहे. नोंदणीसाठी एक दुय्यम निबंधक आणि एक कारकून असे दोन सरकारी कर्मचारी असतील.

राज्यात खाजगी ६० दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. विभागाने जास्तीत जास्त ६ हजार रुपये आकारण्याची मुभा दिली आहे. त्यापेक्षा कमी दराची निविदा स्वीकारण्यात येईल.
अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!