औरंगाबाद नव्हे “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्टेशन, केंद्राकडून ….
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | केंद्रीय गृह मंत्रालयाने औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक’ अशा नामांतराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या रेल्वेस्थानकाच्या नावापुढील ‘औरंगाबाद’ हे नाव मिटवून ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव लिहिले जात आहे. केंद्राने २०२२ मध्ये औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास मान्यता दिली होती. आता, रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर होऊनही रेल्वेस्थानकावर मात्र औरंगाबाद रेल्वेस्थानक अशीच पाटी होती. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता स्थानकाच्या नाव बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर स्थानकावरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून काढत त्यावर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक असे नाव लिहिले जात आहे. ‘औरंगाबाद’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. या स्थानकाचा नवीन स्थानक कोड ‘कॅप्शन’ असा असेल. त्यामुळे ‘औरंगाबाद’ रेल्वे स्थानकास आता पुढे ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड CPSN असा राहील.
राज्य सरकारने घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता. शासनाच्या नामांतरच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असता नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं. यावेळी नाव बदललं की, काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच आहेत, असंही सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं. त्याचप्रमाणे सर्वोत महत्त्वाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान अधोरेखीत केला आहे. अलहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखं नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं.
अशातच आता ‘औरंगाबाद’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता स्थानकाच्या नाव बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर स्थानकावरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून काढत त्यावर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक असे नाव लिहिले जात आहे.

