भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल-फैजपूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल – फैजपूर दरम्यानच्या रस्त्यावरील बालाजी इंडस्ट्रीज एक भीषण अपघात घडला.
या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या अकिलेश उर्फ गोलू अविनाश कोळी (वय २५, रा. महाराणा प्रताप नगर, यावल) या तरुणाचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अकिलेश हा आपल्या पल्सर दुचाकीने (एमएच १९ डिक्यू ३७०६) रावेरकडून यावलकडे जात होता. यावल जवळील बालाजी इंडस्ट्रीजजवळील वळणावर एका अज्ञात वाहन चालकाने हयगयीने व भरधाव वेगाने वाहन चालवत अकिलेशच्या दुचाकीला कट मारला. या धडकेमुळे अकिलेश दुचाकीवरून फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर अकिलेशवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

मृत अकिलेशच्या पश्चात केवळ आई असून, तरुण मुलाच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी पुढील तपास करत आहेत. अद्याप अज्ञात वाहन चालकाचा शोध लागलेला नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!