भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

तापी परिसरात रेशन दुकानावर मापात पाप? १५०० ते २००० घेऊन समाविष्ट केले जाते मोफत धान्य योजनेत नाव

सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील तापी परिसरात स्वस्त धान्य दुकानदार मोफत धान्य योजना अंतर्गत धान्य वाटपात मोठा भ्रटाचार करत असल्याची ओरड तापी परिसरातील नागरिकांमधून जोर धरत आहे

स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरण करित असतांना बऱ्याचश्या लाभार्थीनां धान्य कमि देत असतात त्यांना सांगितले जाते की वरूनच धान्य कमि आले आहे. आणि धान्य वितरणाची कुठली पावती सुद्धा दिली जात नाही . यामुळे अनेक राशन धारकांची फसवणूक स्वस्त धान्य दुकानदार करित असतात. वाटप न केलेले धान्य जाते कुठे?

मृतांच्या नावावरील धान्य गायब
अनेक रेशन मध्ये मृत झालेल्या व्यक्तींची नवे आहेत. राशन धारकाच्या घरातील कोणता सदस्य मरण पावला तर दुसऱ्याच महिन्यापासून त्याचे धान्य देणे बंद केले जाते. मात्र पुरवठा विभागाला याची कुठलीही सुचना किंवा राशन कार्ड मधुन त्याचे नाव वगळले जात नसुन त्याचे धान्य राशन दुकानदार घेत असतो हा प्रकार फक्त एकाच परिवारा सोबत नव्हे तर सर्वांसोबत केला जातो यातून धान्य दुकानदार शासनाची फसवणूक करून स्वतःचा आर्थिक फायदा घेत आहे. धान्य वितरण करण्याची वेळ सुद्धा शासनाने आखुन दिलेल्या नियमावली वरती नव्हे तर फावल्या वेळेवर वाटप करित आहे.

१५०० ते २००० घेऊन योजनेत नाव समाविष्ट केले जाते
यात सर्वात मोठा व महत्त्वाची मिळालेली माहिती अशी की, खरे लाभार्थी डावलून १५०० ते २००० रुपये घेवून या योजनेत बसत नसलेल्या व लाभार्थी नसलेल्या व्यक्तीना सुद्धा मोफत धान्य योजनेत समाविष्ट करून घेतले जात आहे. आजच्या स्थितीला सुद्धा अशा अनेक व्यक्तिंना स्वस्त धान्यांचा लाभ मिळत आहे व जे खरच लाभार्थी आहेत त्यांना मात्र स्टॉक खाली नाही असे सांगून डावलणे सुरु आहे. मात्र लाभार्थ्यांना कमी धान्य देऊन वाचविलेले शिल्लक धान्य जाते कुठे?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!